झिरो का भाव
• रघुनाथ सोनटक्के
बायको माझी आज नोटा
देत होती पाचशे न हजार
आधी मात्र मागितल्याने
देत नव्हती उधार
हे घ्या हजारच्या नोटा
म्हणे आणा आज बाजार
मि झालो चकीत म्हटलं
झाला काय हिला आजार ?
म्हटलं तुझ्याकडे आलं कसं
हे काळं धन
आज कशी झाली एवढी उदार
केलं मोठ मन
गेलो खुशित बाजारात
घ्याव म्हटलं मटण
शंभरची द्या म्हणे तो
वाटलं त्यांकडे चिल्लर नसंण
आर्डर केला पिज्जा
अन् मागितला मि खंबा
बर्याच दिवसांनी म्हटलं
करतो पाय लंबा
सुट्टे कशाला देतो भावा
दे दाणे अन् चकणा
हजाराची बघुन म्हणे चलती नय इधर
दुसरी ओर देखना
न पिता दारू अाज
चढली कशी फार
हजारच्या होत्या दोन माझ्याकडे
अन् पाचशेच्या चार
कालेधनका पैसा भाऊ
अभी इधर मत लाव
एक रातमे कर दिया मोदीजीने
झिरो का भाव
सोडून देला खंबा
अन् पिज्जा बि गेला
मोदीजींनी आजपण माझा
पालु पचका केला
अंगातला माझा जिवच गेला
माहित नव्हतं मला असा भारी
माणुस आहे हा 'सर्जिकल'वाला
गेलो होतो वाघासारखा
थंडा होऊन आलो
बायकोपुढे परत एकदा मी
उंदीरमामा झालो
• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
८८०५७९१९०५
raghunathsontakke@gmail.com

0 comments:
Post a Comment